.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
महाड : संभाव्य दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाड एमआयडीसीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आगामी काळातील पाणीटंचाई टाळण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाने आता दर मंगळवारी सकाळी ८ ते रात्री ८ असे सलग १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.