

Ancient Mankala game found in Roha
ESakal
अमित गवळे
पाली : कोकणातील दुर्गवैभव केवळ त्यांच्या अभेद्य तटबंदीसाठीच नाही, तर तेथील समृद्ध सामाजिक जीवनासाठीही ओळखले जाते. याचाच एक पुरावा रोहा तालुक्यातील बीरवाडीगड आणि घोसाळगड परिसरात सापडला आहे. १२०हून अधिक प्राचीन मंकला खेळाचे पट शोधण्यात संशोधकांना यश आले आहे.