

Nilima Patil defeat & Sharmila Bodke won in ZP Election
ESakal
अमित गवळे
पाली : रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सुधागड तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत आज एक मोठा राजकीय चमत्कार पहायला मिळाला. जांभूळपाडा जिल्हा परिषद गटातून शिवसेना (शिंदे गट) आणि 'सुधागड सन्मान समिती'च्या उमेदवार शर्मिला शरद बोडके यांनी भाजपच्या उमेदवार आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा नीलिमा धैर्यशील पाटील यांचा २,९३१ मतांच्या फरकाने दणदणीत पराभव केला.