रेल्वे अपघातग्रस्ताला साडेचार लाखांची भरपाई 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

मुंबई - अधिकृत रेल्वे प्रवाशाचा अन्य काही कारणांनी अपघाती मृत्यू झाला, तर नुकसानभरपाईची जबाबदारी रेल्वेची आहे, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने एका प्रकरणात अपघातग्रस्ताला साडेचार लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश नुकतेच रेल्वेला दिले. 

धावत्या रेल्वेगाडीत चढताना अपघात झाल्यामुळे एक पाय कायमचा अधू झालेल्या प्रवाशाला नुकसानभरपाई देण्यास नकार देणाऱ्या रेल्वे प्रशासनाबाबत उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. हा प्रवासी टुथब्रश घेण्यासाठी स्थानकावर उतरला होता; परंतु गाडी सुरू झाल्याने ती पकडताना त्याला अपघात झाला होता. 

नागपूरच्या एकवीस वर्षीय विद्यार्थ्याने नुकसानभरपाईसाठी याचिका दाखल केली होती. सात वर्षांपूर्वी हा विद्यार्थी रेल्वेने नागपूर ते त्रिपुरा प्रवास करीत होता. गाडी चंद्रपूर रेल्वेस्थानकावर पोचल्यावर तो टूथब्रश खरेदी करण्यासाठी फलाटावर उतरला; मात्र तेथील सर्व दुकाने बंद होती. गाडी सुरू झाल्यामुळे तो घाईघाईने डब्यात चढत असताना त्याला अपघात झाला. त्यात त्याचा डावा पाय कायमचा अधू झाला. त्याने नुकसानभरपाईसाठी रेल्वेकडे अर्ज केला होता; मात्र त्याच्याच चुकीमुळे अपघात झाला, अशी भूमिका रेल्वे प्रशासनाने घेतली आणि त्याचा दावा नाकारला. त्याविरोधात त्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे याचिका दाखल केली. 

रेल्वे प्रवाशांना सोयी देणे आणि त्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था पाहणे हे रेल्वेचे काम आहे, त्यात कसूर झाली तर नुकसानभरपाई मिळायला हवी, असा युक्तिवाद त्याच्या वतीने करण्यात आला. मात्र, प्रवाशांच्याच चुकीमुळे अपघात झाल्यास त्यांना भरपाई मिळू शकत नाही, असा दावा प्रशासनाने केला. न्या. एस. बी. शुक्रे यांनी हा दावा अमान्य केला. रेल्वे कायद्यानुसार जे प्रवासी टपावर बसून किंवा दरवाजाच्या पायऱ्यांवर बसून प्रवास करतात, त्यांना भरपाई मिळू शकत नाही. मात्र वस्तू खरेदी करण्यासाठी खाली उतरलेल्या तिकीटधारक प्रवाशाला गाडीत चढताना अपघात झाला, तर त्याला भरपाई मिळायला हवी, असे मत न्यायालयाने नोंदवले. 

Web Title: railway accident court