रेल्वेच्या बनावट तिकीटविक्री पर्दाफाश 

रेल्वेच्या बनावट तिकीटविक्री पर्दाफाश 

नाशिक : दिवाळीच्या तोंडावर ऑनलाइनच्या माध्यमातून बनावट रेल्वे तिकिटांद्वारे गंडा घालणाऱ्या एका मोठ्या टोळीचा रेल्वे सुरक्षा दलाने शनिवारी (ता. 3) पर्दाफाश केला. ऑनलाइन रेल्वे तिकिटांच्या गैरव्यवहारात आतापर्यंत 116 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. 891 दलालांना ताब्यात घेत दीड कोटीची रोकड, तर पावणेसहा कोटींची रेल्वे तिकिटे रेल्वे सुरक्षा दलाने हस्तगत केली. 

ऐन दिवाळीच्या तोंडावर "ऑपरेशन तुफान' या मोहिमेअंतर्गत 7 ऑक्‍टोबर ते 2 नोव्हेंबरदरम्यान देशातील विविध भागांतील शंभराहून अधिक शहरांत एकाच वेळी ही मोहीम राबवून सणासुदीत हजारो प्रवाशांची फसवणूक रोखण्यात यश आले. रेल्वे सुरक्षा दलाने या प्रकरणात दिल्लीत हजारो नागरिकांच्या नावाने बनावट आयडीची यादी, तर मुंबईत एक बनावट सॉफ्टवेअरही हस्तगत केले. ई-तिकीट आरक्षित करण्यापासून ते विकणारे आणि विकत घेणाऱ्यापर्यंतची लांबलचक साखळीच शोधण्यात यश आले. 

दिल्लीत आयडी, मुंबईत सॉफ्टवेअर 

रेल्वे बोर्डाच्या सुरक्षा संचालकांच्या म्हणण्यानुसार, तिकीट आरक्षणासाठी प्रवाशांच्या बनावट ओळखीच्या आधारे तिकीट तयार करणारे एजंट, प्रवाशांच्या बनावट आयडी विक्रेत्यांची टोळी व खरेदीदार, अशी साखळी उलगडली आहे. 2 नोव्हेंबरपर्यंतच्या कारवाईत रेल्वे सुरक्षा दलाच्या विविध पथकांनी देशभरातील 185 प्रमुख दलालांना ताब्यात घेत त्यातील 32 जणांना अटक केली. 

मुद्देमाल हस्तगत 

रेल्वे सुरक्षा दलाने मुंबईतील सॉफ्टवेअरसह 35.68 लाखांची एक हजार 875 फ्युचर ट्रॅव्हल ई-तिकिटे जप्त केली. ऑनलाइन गैरव्यवहारासाठी नियमित वापरले जाणारे एक हजार 268 पर्सनल यूजर आयडी शोधले. संशयितांवर रेल्वे अधिनियम 1989च्या कलम 143 नुसार 166 जणांवर गुन्हे दाखल केले. आतापर्यंत 891 दलाल-एजंटांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. संशयितांकडून 1.50 कोटीची रोकड व 5.75 कोटींची बनावट तिकिटे हस्तगत केली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com