पावसाच्या ओढीमुळे राज्यात ५३६ टॅंकर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

मुंबई - राज्यात पावसाने दडी मारल्याने ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा उलटल्यानंतरही राज्यातील पाणीटंचाई कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पावसाने ओढ दिल्यामुळे मराठवाड्यासह नगर, पुणे जिल्ह्यातही पाणीटंचाई वाढू लागली आहे. सध्या राज्याच्या नऊ जिल्ह्यांतील तब्बल ५२१ गावे आणि ३०७ वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा करण्यासाठी ५३६ टॅंकर सुरू असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागातून देण्यात आली.

जुलै महिन्यात पावसाने मराठवाडा, पश्‍चिम विदर्भ, खानदेश, पश्‍चिम महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात ओढ दिली. गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात सर्वदूर पावसाची उघडीप आहे. औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे, जळगाव, नगर, पुणे, सातारा, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये टंचाईच्या झळा कायम आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक टंचाई असून, गेल्या काही दिवसांत तेथील जवळपास १०० हून अधिक गावांमध्ये टंचाई वाढल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षी ७ ऑगस्ट रोजी राज्यातील ४५३ गावे, एक हजार ६३५ वाड्यांमध्ये टंचाई असल्याने ४४० टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याचे दिसून येते.

Web Title: Rain 536 Water Tanker Water Shortage