गौताळा अभयारण्य श्रावण सरींनी खुलून गेले
गौताळा अभयारण्य श्रावण सरींनी खुलून गेले

पावसाच्या सरींनी राज्य सुखावलं; बळीराजा मात्र संकटात

मान्सूनपूर्व पावसामुळे उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना सुखावणारं वातावरण तयार झालं आहे.
Published on

राज्यातल्या काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. त्यामुळे उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या राज्याला सुखावणारा थंडावा मिळाला आहे. एकीकडे पाऊस सुखावणारा ठरत असला तरी दुसरीकडे शेतकऱ्यांना मात्र या पावसाने संकटात टाकलं आहे. (Rain Before monsoon in various areas of Maharashtra)

गौताळा अभयारण्य श्रावण सरींनी खुलून गेले
आनंदाची वार्ता : जूनच्या पहिल्या आठवड्यात विदर्भात मॉन्सूनचे आगमन?

पंढरपूर भागामध्ये झालेल्या पावसाने अनेक ठिकाणच्या केळीच्या बागांचं नुकसान झालं असून शेवग्याची झाडं कोसळली आहे. तर वादळी वाऱ्यामुळे बेदाण्याच्या शेडवरचे पत्रे उडाल्यानं बेदाण्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अहमदनगर भागातही पावसाने हजेरी लावली. पण ग्रामीण भागात कांदा काढणी सुरू असल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे.

गौताळा अभयारण्य श्रावण सरींनी खुलून गेले
नागपूर : वादळी पावसाने उडविली झोप

पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने जोरदार हजेरी लावली. सांगली, साताऱ्याच्या काही भागांत पाऊस झाला असून पुण्यातल्या काही भागातही तुरळक पावसाने हजेरी लावली. जालना जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये काल संध्याकाळी अचानक विजेचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. बुलडाण्यातही जोरदार पाऊस झाला. मात्र मान्सूनपूर्व नालेसफाई पूर्ण न झाल्याने अनेकांच्या घरासमोर पाणी साचलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com