esakal | राज्यात पावसाचा जोर ओसरला
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून धुव्वाधार पाऊस बरसल्यानंतर काही प्रमाणात जोर ओसरला आहे. कोकणसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात अनेक ठिकाणी दिवसभर ऊन पडले होते.

राज्यात पावसाचा जोर ओसरला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून धुव्वाधार पाऊस बरसल्यानंतर काही प्रमाणात जोर ओसरला आहे. कोकणसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात अनेक ठिकाणी दिवसभर ऊन पडले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा     

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असला तरी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे कोल्हापुरातील धरणांतून नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने नद्यांचे पाणी अजूनही वाढत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे. सोमवारपासून (ता.१०) पुन्हा कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात जोरदार पाऊस पडेल,  असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

Edited By - Prashant Patil