Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यात पावसाचा अंदाज; मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान

IMD Maharashtra Weather : महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांत पावसाचा अंदाज असून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान तयार झाले आहे. जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज.
Maharashtra Weather Update rainfall

Maharashtra Weather Update rainfall

esakal

Updated on

Maharashtra Rain Forecast : मागच्या दोन आठवड्यापासून महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. आज (ता. १८) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांत विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, नाशिक, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सोलापूर, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीप राहण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com