राज्यात काही भागांमध्ये पाऊस, गारपीट; नाशिक, नागपूरमध्ये पिकांचं मोठं नुकसान

गारपिटीमुळं पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं
Rain crop damaged
Rain crop damaged

पुणे : राज्यातील विविध भागांमध्ये आज वातावरणाची अगदीच विषम अवस्था (Heterogeneous environment) पहायला मिळाली. एकीकडे थंडीचं वातावरण तर काही ठिकाणी पावसानं (Nonseasonal Rain) हजेरी लावली. नागपूरमध्ये तर गारपीट (Hail) झाल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नाशिकमध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं द्राक्षं पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. (Rain hail in some parts of the Maharashtra Large crop damage in Nashik Nagpur)

Rain crop damaged
राज्य सरकारची नवी नियमावली; नाईट कर्फ्यूची घोषणा

नाशिकमधील देवळा भागाला शनिवारी अवकाळी पावसानं चांगलच झोडपलं, पिकांचं मोठं नुकासान झाल्यानं इथला शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्याचबरोबर मेशी परिसरात दिवसाआड दुसऱ्यांना अवकाळी पावसानं हजेरी लावली. कळवण तालुक्यातही पावसानं हजेरी लावली. चांदवड तालुक्यातील हिरापूर, भोयेगावसह अनेक गावांमध्ये तुरळक पाऊस झाला. यावेळी काढणी केलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारंबळ उडाली. उमराणे परिसरात पावसामुळं कांदा रोप आणि रब्बी पीक, काढणीला आलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मालेगाव शहर व परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण होतं पण पाऊस झाला नाही. त्याचबरोबर वणी, डांगसौदाणे, रेडगाव खडजाम, महालपाटणे, देवपूरपाडे, ब्राह्मणगाव, निवाणे, ठेंगोडा, किकवारी बुद्रुक, अभोणा आणि इगरपुरी या भागातही पावसानं तुरळक हजेरी लावली.

Rain crop damaged
कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस देणार दीर्घकाळ सुरक्षा - भारत बायोटेक

नागपूरला गारपीटीनं झोडपलं

उपराजधानीत शनिवारी सायंकाळच्या सुमारास गारपिटीसह जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. वादळामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक भागांतील बत्ती गुल झाली होती. विदर्भात आणखी दोन-तीन दिवस वादळी पाऊस व गारपिटीची दाट शक्यता आहे.

'वेस्टर्न डिस्टर्बन्स'मुळे सध्या विदर्भात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने खरं तर रविवारपासून वादळी पावसाचा इशारा दिला होता. मात्र वरुणराजाने एक दिवस अगोदरच मुहूर्त साधला. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र सायंकाळी सातच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले. पाहतापाहता विजांचा प्रचंड कडकडाट व मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरवात झाली. जवळपास अर्धा तास शहरात विशेषतः पश्चिम नागपुरातील गोधनी, झिंगाबाई टाकळी व मानकापूरसह आजूबाजूच्या परिसरात तुफान पाऊस बरसला. या भागांत हलक्या गाराही पडल्या.

Rain crop damaged
राज्यात रुग्णवाढ सुरुच; दिवसभरात 41 हजार 434 नवे रुग्ण

वादळामुळे अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना तासभर अंधारात राहावे लागले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. ग्रामीण भागांतही गारपीट व वादळी पाऊस झाल्याचे वृत्त आहे. प्रादेशिक हवामान विभागाचा दोन- तीन दिवस येलो अलर्ट असल्यामुळे विदर्भात आणखी दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com