कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस देणार दीर्घकाळ सुरक्षा - भारत बायोटेक

चाचण्यांमध्ये गंभीर दुष्परिणामही दिसून आलेले नाहीत
Covaxin
CovaxinSakal

हैदराबाद : कोव्हॅक्सिन लसीचा बूस्टर डोस (Booster Dose) दीर्घकाळ सुरक्षा प्रदान करु शकतो तसेच यामुळं कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत, असं चाचण्यांमध्ये दिसून आल्याचा दावा भारत बायोटेकनं (Bharat Biotech) केला आहे. केंद्र सरकारने बूस्टर डोसला परवानगी दिली असून ३ जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रन्ट लाईन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील नागरिकांना गरजेनुसार बूस्टर डोस देण्यात येत आहेत. (Booster doses of covaxin will provide long term protection Bharat Biotech claims)

कोव्हॅक्सिन निर्माता कंपनी भारत बायोटेकनं म्हटलं की, "ट्रायलमध्ये कोव्हॅक्सिनच्या बूस्टर डोस दीर्घकाळ सुरक्षा प्रदान करु शकतो असं दिसून आलं आहे. तसेच यामुळं कोणतेही गंभीर दुष्परिणाम झाल्याचं दिसून आलेलं नाही. दुसऱ्या डोसनंतर सहा महिन्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत बूस्टर डोस घेतला आहे त्यांच्यापैकी ९० टक्के लसधारकांमध्ये अँटिबॉडीजचा प्रतिसाद दिसून आला आहे"

Covaxin
Covaxin 2 ते 18 वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित: भारत बायोटेक

दरम्यान, भारतात नुकतेच १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठीचं लसीकरण सुरु झालं आहे. मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीला डीसीजीआयनं मान्यता दिली आहे. यापार्श्वभूमीवर भारत बायोटेकनं नुकतंच म्हटलं होतं की, कोव्हॅक्सिनची लस 2-18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी देखील 'सुरक्षित, सुयोग्य आणि इम्युनोजेनिक' असल्याचं आढळून आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com