Treasure Box
Treasure Box

Treasure News: घराच्या खोदकामात सापडली ४०० किलो वजनाची तिजोरी! यात जे सापडलं त्यानंतर...

महसूल अधिकारी आणि पोलिसांच्या मदतीनं तब्बल तीन तासांनंतर ही तिजोरी उघडण्यात यश आलं.
Published on

हैदराबाद : आंध्र प्रदेशातील एका गावामध्ये जुन्या इमारतीच्या खोदकामात मोठी तिजोरी सापडल्याची माहिती आहे. या तिजोरीचं वजन तब्बल ४०० किलो आहे. यामुळं आता मोठं घबाड हाती लागणार या आशेनं ज्यांच्या मालकीची ही इमारत होती ते यामुळं भलतेच आनंदी झाले. पण ही तिजोरी खोलल्यानंतर त्यात जे काही सापडलं ते पाहुन तर या कुटुंबाची 'हसावं की रडावं' अशी अवस्था झाली होती. (Treasure News 400 kg safe was found in house digging need to know What found in that)

Treasure Box
NEETच्या क्लासला प्रवेश नाकारला, १८ वर्षीय विद्यार्थीनीची आत्महत्या! काय घडलंय वाचा?

खोदकामात अशा प्रकारे मोठ्या वजनाची तिजोरी सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली त्यानंतर मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. यानंतर ज्यांच्या जागेत ही तिजोरी सापडली त्या जागामालकानं थेट पोलिसांनी फोन केला. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत ही तिजोरी उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी गॅस कटरनं या तिजोरीचं टाळं तोडलं.

Treasure Box
लग्न केल्यामुळं आयुष्य वाढतं! संशोधनातून झालं सिद्ध : Benefits Of Marriage

टाळं तोडल्यानंतर ही तिजोरी पूर्णपणे उघडण्यात आली, तर त्यामध्ये केवळ कागदाची रद्दी, वाळू, लोखंड, स्टीलचे तुकडे अशा वस्तू आढळून आल्या. काहीतरी मोठं घबाड मिळेल या आशेनं जमा झालेले लोक निराश होऊन निघून गेले. यानंतर घटनास्थळावरील गर्दी देखील पांगरली.

हे ही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सर्व कागदपत्रं बेकायदा

करिवेमुलाचे रहिवासी नरसिम्हुलु यांनी कृष्णा रेड्डींशी संबंधित एक जुनं घर खरेदी केलं होतं. त्याच जागी नवं घर बांधण्यासाठी त्यांनी हे तोडायलाही सुरुवात केली. मजुरांना पाया खोदताना लोखंडाची एक जुनी तिजोरी सापडली. इतर मजुरांच्या मदतीनं त्यांनी ही तिजोरी बाहेर काढली कारण याचं वजन सुमारे ४०० किलो इतकं होतं. यामुळं मात्र संपूर्ण गावात लोखंडी तिजोरीची माहिती पसरली. तसेच या तिजोरीत काय असेल या उत्सुकतेपोटी सर्व लोक बाहेर जमा झाले. मोठ्या प्रयत्नांनंतर मंगळवारी महसूल अधिकारी आणि पोलिसांनी तीन तासांनंतर ही तिजोरी उघडली. यानंतर अधिकाऱ्यांना यामध्ये काही जुनी कागदपत्रे आणि वाळू मिळाली. पण ही कागदपत्रे तपासल्यानंतर ती देखील अवैध असल्याचं स्पष्ट झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com