पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता

Rain
Rain

पुणे - अखेरच्या टप्प्यात मॉन्सूनच्या पावसाने विदर्भ, कोकणात दमदार हजेरी लावली आहे. कोकणसह विदर्भात पावसाची मुसळधार कायम असल्याने नद्यांनी पात्र सोडले आहे. घाटमाथ्यावरील पावसाने कोल्हापूर, सांगलीत पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे. 

रविवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोल्हापूरमधील गगनबावडा येथे सर्वाधिक २४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र निवळू लागल्याने पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. 
आज (ता. ९) कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे; तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मुंबई शहरातदेखील मध्यरात्रीपासून पाऊस पडत असून, आज सकाळी मुंबईतील सखल भाग असलेल्या सायन, दादर आणि हिंदमाता परिसरात पावसाचे पाणी साचले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक नद्या पूररेषा ओलांडण्याच्या स्थितीत आहेत. 

३०० गावांचा संपर्क तुटलेला
गडचिरोलीतील पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती, प्राणहिता, वैनगंगा या नद्यांना पूर आल्याने भामरागडला मोठा फटका बसला आहे. सत्तर टक्के गाव पाण्याखाली आले आहे. सहाशेवर गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. २० प्रमुख मार्गांवरील पूल पाण्याखाली आल्याने सुमारे ३०० गावांचा दोन दिवसांपासून संपर्क तुटलेला आहे. तर, या पुरात जिल्ह्यातील तीन जण वाहून गेले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com