मध्य महाराष्ट्राने सरासरी ओलांडली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

पुणे - मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली असून, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात सरासरी गाठली आहे. सांगली, सोलापूर आणि नंदुरबार येथे मात्र पावसाने ओढ दिल्याची माहिती हवामान खात्याने रविवारी (ता. २६) दिली. 

राज्यात जूनमध्ये सुरवातीलाच पावसाने ओढ दिली होती. त्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने जोर धरला. मात्र, त्यानंतर पुन्हा विश्रांती घेतल्याने ऑगस्टच्या मध्यापर्यंत राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिली होती. त्यात सांगली, सोलापूरसह जळगाव, धुळे, नंदुरबार, लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी या जिल्ह्यांचा समावेश होता. ऑगस्टच्या मध्यानंतर राज्यातील पावसाचा जोर वाढला.
 
राज्यात ६ टक्के जास्त पाऊस
राज्यात एक जून ते २६ ऑगस्ट दरम्यान ८३६.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या दरम्यान, राज्यात ७८८.२ मिलिमीटर पाऊस पडतो. सरासरीच्या तुलनेत यंदा सहा टक्के जास्त पाऊस पडल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, विदर्भातील अकोला, वाशिम आणि मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित महाराष्ट्रातील सरासरी गाठली आहे.

Web Title: rain percentage increase