.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Maharashtra Rain Update: मॉन्सून यंदा महाराष्ट्रात १२ दिवस आधीच दाखल झाला आहे. मुंबई, कोकणासह, पुणे, सोलापूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये मॉन्सून दाखल झाल्याचं पुणे वेधशाळेकडून अधिकृतरित्या सांगण्यात आलं आहे. त्यामुळं सर्वत्र पावसानं हजेरी लावली आहे. मान्सूनचा महाराष्ट्रात दाखल होण्याचा अपेक्षित काळ हा ८ जूनचा असतो पण यंदा त्यानं लवकर हजेरी लावली आहे. केरळमध्ये देखील ८ दिवस आधी मॉन्सून दाखल झाला आहे. मॉन्सूनची ही अपडेट पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिली आहे.