
Mumbai Rain Update: मुंबईत सध्या तुफान पाऊस कोसळत असून शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत. अनेक घरांमध्ये आणि सार्वजनिक इमारतींमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांना गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे. अशाच प्रकारे मुंबईतील केईएम रुग्णालयात देखील पावसाचं पाणी शिरलं असून यामुळं तिथं असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे.