राज्यात शुक्रवारपासून पाऊस सक्रिय होणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

पुणे - पावसाच्या लांबलेल्या विश्रांतीनंतर आता कोकणासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) राज्यात शुक्रवार (ता. 6) पासून पुन्हा सक्रिय होईल, असेही खात्याने स्पष्ट केले आहे. 

राज्यातील बहुतांश भागात आठ ते दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. मात्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगांची गर्दी वाढत असल्याचे निरीक्षण हवामान तज्ज्ञांनी नोंदविले आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालय पर्वताच्या पायथ्याकडे सरकल्याने राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. पश्‍चिम किनाऱ्यालगत असलेला कमी दाबाचा पट्टा आणि पूर्व किनारपट्टीवर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे कोकणात काही ठिकाणी आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. कोकणातील देवगड येथे दमदार पाऊस पडला. मॉन्सूनची आस गुरुवार (ता. 5) पर्यंत उत्तरेकडेच राहणार आहे. त्यानंतर राज्यात पावसाला पोषक वातावरण होण्याचे संकेत आहेत. शुक्रवारी राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्‍यता असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 

Web Title: Rain will be active in the state from Friday