esakal | पुढील तीन दिवस राज्याला धोका; 'या' जिल्ह्यांत 'मुसळधार'
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबाद, कोकणाला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे.

पुढील तीन दिवस राज्याला धोका; 'या' जिल्ह्यांत 'मुसळधार'

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कायम असून आजही (ता. 8) मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा हवामान विभागाकडून (Meteorological Department) देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या 2-3 दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या औरंगाबाद, कोकण (Konkan) व मध्य महाराष्ट्रात जोरदार अतिवृष्टी सुरु आहे. त्यामुळे आजही राज्यातील 12 जिल्ह्यांत अति मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशाराही हवामानकडून दिला गेलाय.

गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबाद, कोकणाला पावसाने अक्षरश: झोडपून काढले असून या भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे त्या 2-3 दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यात पावसाची संततधार कायम असून आजही अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा: ठरलं! आगामी निवडणुकांची 'रणनीती' भाजप ठरविणार

दरम्यान, मुंबई-ठाणे पुण्यासह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला असून पालघरला रेड अलर्ट देण्यात आलाय. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पालघर जिल्ह्याबरोबर ठाणे, मुंबई पुण्यासह किनारपट्टी लगतच्या भागाला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलाय. तर औरंगाबाद, नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलीय. याच पार्श्वभूमीवर हवामानकडून नागरिकांना घरीच राहण्याचा सल्लाही दिला गेलाय. पुढचे 5 दिवस राज्यात तीव्र पावसाची शक्यता वर्तविल्याने गणेशोत्सवाच्या तोंडावर नागरिकांनी चिंता व्यक्त केलीय.

loading image
go to top