Weather Update | राज्यात कुठे पाऊस, तर कुठे थंडी! जाणून घ्या सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

weather update

राज्यात कुठे पाऊस, तर कुठे थंडी! जाणून घ्या सविस्तर

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : राज्यात या आठवड्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि थंडी (rain and cold) असे विचित्र चित्र राहणार आहे. हवामान बदलाचा (weather update) हा परिणाम आहे. एकीकडे थंडी वाढत असली तरी राज्यात (maharashtra news) अनेक भागात पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाचा कुठे होणार पाऊस, अन् कुठे पडणार थंडी...जाणून घ्या सविस्तर...

रविवारीही राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

एकीकडे थंडी वाढत असली तरी राज्यात अनेक भागात पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. तर शनिवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. रविवारीही राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा: हिंदूत्वाची ISISसोबत तुलना; वादावर खुर्शीद म्हणतात, 'देशात स्वातंत्र्य आहे की नाही?'

नाशिकचे निफाड कूल कूल

तामिळनाडूत चेन्नईजवळ चक्रीवादळ निर्माण झाले असून उत्तरेकडून हिमालयाच्या पायथ्यापासून थंड वारे थेट नाशिकच्या दिशेने वाहत आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात किमान 11 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. राज्यात काल बुधवारी नीचांकी तापमानाची नोंद जळगावमध्ये झाली. तिथेही पारा 11 अंशापर्यंत घसरला, तर पुण्यात 11.8 तापमानाची नोंद करण्यात आली.

हेही वाचा: एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाबाबत संजय राऊतांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले...

loading image
go to top