राज्यात बुधवारपर्यंत पावसाची उघडीप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

पुणे - राज्यात बहुतांशी ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. रविवारी दुपारनंतर विदर्भ वगळता राज्यात सर्वदूर मुख्यत: निरभ्र आकाश होते. बुधवारपर्यंत राज्यात पावसाची उघडीप कायम राहणार असून, तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर बुधवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

दरम्यान, रविवारी गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यात काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. सावर्डे येथे १७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर असुर्डे, शिरगाव, राजापूर येथे १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर मराठवाड्यात कोरडे हवामान होते. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला आहे.

Web Title: rains until Wednesday in the state