
राज ठाकरेंचे शरद पवारांवरील आरोप खरे? संभाजीराजे छत्रपती म्हणतात...
शरद पवार शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव घेतात, शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत, अशी टीका राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून केली होती. या विधानानंतर आरोप-प्रत्यारोप, टीकाटिपण्ण्यांचा खेळ सुरू झाला. राष्ट्रवादीने जातीपातीचं राजकारण सुरू केल्याची टीकाही राज ठाकरेंनी केली. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी भाष्य केलं आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादीवर केलेल्या आरोपात किती तथ्य आहे, याबद्दल संभाजीराजे बोलले आहेत.
हेही वाचा: राज ठाकरेंचं शिवाजी महाराजांबद्दलचं विधान; संभाजीराजे संतापून म्हणाले...
एबीपी माझाशी बोलताना संभाजीराजे म्हणाले, "पवार साहेब काय बोलले, राज ठाकरे काय बोलतात, याच्याशी माझा काही संबंध नाही. महाराष्ट्र कोणाचा आहे? महाराष्ट्र शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, आंबेडकरांचा आहे, महापुरुषांचा आहे. या सगळ्या महापुरुषांचा आदर्श घेऊन आपण पुढे जाणं गरजेचं आहे."
हेही वाचा: शरद पवार शिवाजी महाराजांचा कधीच उल्लेख करत नाहीत, कारण.. - राज ठाकरे
राज ठाकरेंच्या आरोपांबद्दल बोलताना संभाजीराजे म्हणाले, "आज मी त्या दोघांचा प्रवक्ता नाही, की ते काय बोलले हे काय बोलले यावर मी माझी प्रतिक्रिया देऊ. माझी बाजू मला क्लियर आहे. माझं हेच म्हणणं आहे की महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, बेकारीचा प्रश्न आहे, कामगारांचा, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. त्यावर बोलूया. सारखं सारखं याच विषयावर काय बोलायचं? मला त्यात पडायचं नाहीये. "
Web Title: Raj Thackeray Allegations On Sharad Pawar Sambhajiraje Chhatrapati
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..