राज ठाकरेंचं शिवाजी महाराजांबद्दलचं विधान; संभाजीराजे संतापून म्हणाले...

राज ठाकरेंनी माफी मागावी की नाही, याबद्दलही संभाजीराजे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
sambhajiraje
sambhajirajeeskal

राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीबद्दल केलेलं वक्तव्य इतिहासाला धरून नाही, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती(SambhajiRaje Chhatrapati) यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. संभाजीराजे यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ आज संपत आहे. त्यानिमित्त ते बोलत होते.

एबीपी माझाशी संभाजीराजे छत्रपती यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. राज ठाकरे यांच्या १ मे रोजी झालेल्या सभेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली अशा आशयाचं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावर जोरदार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनीही आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संभाजीराजे म्हणाले, कोणीही असेल आणि प्रामुख्याने जे जबाबदार व्यक्त असतात, त्यांनी लक्षात ठेवावं की इतिहासाला धरून बोलावं. समाधी ज्यांनी कोणी बांधली ते म्हणाले हे साफ चुकीचं आहे., ते इतिहासाला धरून नाही, हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. त्यात मी खोल जाण्यापेक्षा त्यांनीच त्याचा अभ्यास करावा. पण ह्या मिनिटाला मी सांगू इच्छितो की ज्या जबाबदार व्यक्तीने समाधी बांधण्याविषयीचं जे विधान केलंय ते साफ खोटं आहे.

sambhajiraje
सभेत काय काय घडलं? कोणत्या मुद्द्यांवर व्यक्त झाले राज ठाकरे? जाणून घ्या

संभाजीराजे पुढे म्हणाले, "तो अँगल त्यांनी का घेतला, त्यांचा दृष्टिकोन काय याबद्दल मला कोणतंही भाष्य करायचं नाही. मला आत्ता फक्त एवढंच बोलायचं आहे की इतिहास जेव्हा आपण मांडतो, तो आपल्याला १०० टक्के माहित असेल तरच बोलावं, नाहीतर त्याला हातही लावायचा नाही. मी आत्ता एवढंच सांगतो की, ही समाधी टिळकांनी बांधलेली नाही."

sambhajiraje
छत्रपतींच्या समाधीसाठी टिळकांनी खडाही लावला नाही : छगन भुजबळ

राज ठाकरेंनी माफी मागावी का याबद्दल विचारणा केली असता संभाजीराजे म्हणाले की, तो त्यांचा विषय आहे, मी त्यावर भाष्य करणार नाही. मला जर तुम्ही इतिहास विचारला तर छत्रपतींचा वंशज या नात्याने मी अधिकृतपणे सांगू इच्छितो, विचार करून सांगू इच्छितो की ती समाधी लोकमान्य टिळकांनी बांधलेली नाही. त्यांची समाधी बांधण्याचं श्रेय सगळ्या लोकांचं आहे. महात्मा फुले तिथे गेले, त्यांना ती समाधी दिसली, तिथे पूजा अर्चा सुरू झाली, १९२५ ला ती बांधली गेली. ह्या समाधीचं श्रेय शिवभक्तांचं आहे, कोणाचं वैयक्तिक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com