मुंबई - गेल्या अठरा वर्षांपासून परस्परांपासून दुरावलेले ठाकरे बंधू हे आज मराठीच्या मुद्यावरून एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. ‘एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी’ असे ठामपणे सांगत शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करण्याचे स्पष्ट संकेत दिले.