Raj Thackeray : राज ठाकरे-आशिष शेलार भेट, तासभर चर्चा; केंद्रीय नेतृत्वाचा निरोप? पडद्याआड काय घडतंय

भारतीय जनता पक्षामध्ये सध्या ज्या पद्धतीने इन्कमिंग सुरु आहे, त्यावरुन येनकेन प्रकारे संख्याबळाचा आकडा गाठण्याचं लक्ष्य दिसून येतंय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी तर जाहीरच केलं की, जो येईल त्याला सोबत घेण्यासाठी आम्ही तयार आहोत.
Raj Thackeray
Raj Thackerayesakal

मुंबईः भारतीय जनता पक्षामध्ये सध्या ज्या पद्धतीने इन्कमिंग सुरु आहे, त्यावरुन येनकेन प्रकारे संख्याबळाचा आकडा गाठण्याचं लक्ष्य दिसून येतंय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी तर जाहीरच केलं की, जो येईल त्याला सोबत घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. एकूणच कुणासोबत युती तर कुणाला थेट पक्षप्रवेश, असाच भाजपचा धडाका सुरुय.

त्यातच आता सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजप नेते आशिष शेलार यांनी भेट घेतली. यापूर्वीदेखील राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटी झालेल्या आहेत. ही भेट नेमकी कोणत्या कारणाने झाली, हे अधिकृतरित्या पुढे आलेलं नसलं तरी दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली आहे. शेलारांनी ठाकरेंना केंद्रीय नेतृत्वाचा निरोप दिल्याचं बोललं जात आहे. 'टीव्ही ९ मराठी'ने याबाबत वृत्त दिले.

भविष्यातील लोकसभा आणि मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांकडे भाजपने लक्ष्य केंद्रित केल्याचं दिसून येतंय. त्यामुळे मनसेला सोबत घेऊन भाजप येणाऱ्या निवडणुकांना सामोरं जाण्याची चिन्हं दिसून येत आहेत. भाजपकडून कायमच मनसेचं स्वागत करण्यात येत आहे. मात्र मनसे काय भूमिका घेणार, यावर सगळी राजकीय गणितं अवलंबून आहेत.

Raj Thackeray
India Spy Satellite : भारताचा पहिला खासगी हेरगिरी उपग्रह लाँचसाठी सज्ज; 'टाटा'ने केली निर्मिती, 'स्पेस-एक्स' करणार प्रक्षेपण - रिपोर्ट

सोमवारी सकाळी आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यात तासभर चर्चा झाली. भेटीनंतर संदीप देशपांडे माध्यमांशी बोलताना म्हणाले, राज ठाकरे आणि भाजप नेत्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे दोघांमध्ये भेट झाली असेल. या भेटीतून लगेच युतीची चर्चा करण्यात अर्थ नाही. यापूर्वीही देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज ठाकरेंची भेट झाली होती, असं देशपांडे बोलले.

Raj Thackeray
Love Storiyaan: 'लव्ह स्टोरीयां'च्या सहाव्या एपिसोडवर सहा देशांमध्ये बंदी; नेमकं काय दाखवलंय करण जोहरच्या सीरिजमध्ये? जाणून घ्या...

दरम्यान, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही या भेटीवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्यामुळे त्यांची भेट झाली असेल. जर या भेटीत राजकीय चर्चा झाली असेल तर आनंदाचीच बातमी आहे. मनसे आणि भाजप एकाच विचारधारेचे पक्ष आहेत. ते एकत्र आले तर चांगलंच आहे. कारण भाजपने नेहमीच बेरजेचं राजकारण केलेलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com