
पक्षाची बैठक संपताच राज ठाकरेंचा अयोध्येचा कार्यक्रम ठरला; योगींसोबत...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. मशिदींवरील भोंग्यांबाबतची त्यांची आक्रमक भूमिका, ३ मेचा अल्टिमेटम आणि त्यांच्या बहुचर्चित सभा यामुळे राज्यातलं वातावरण सध्या चांगलंच तापलंय. अशातच राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावरही जाणार आहेत. या दौऱ्याविषयी आता अधिक माहिती मिळत आहे.
हेही वाचा: राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट, वळसे पाटलांची तत्काळ बैठक
राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते केवळ राम मंदिरात जाऊन भगवान श्रीरामांचं दर्शन घेऊन परतणार आहेत. राज ठाकरे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार नाहीत. तसंच ते अयोध्येतूनत पत्रकार परिषदही घेणार नाहीत, अशी माहिती हाती येत आहे. ते पूर्ण एक दिवस अयोध्येत असतील. राज ठाकरे यांना राज्याच्या सरकारी पाहुण्याचा दर्जा दिला जाणार नाही.
हेही वाचा: सभेत काय काय घडलं? कोणत्या मुद्द्यांवर व्यक्त झाले राज ठाकरे? जाणून घ्या
राज ठाकरे अयोध्येला दौरा जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांना केंद्र सरकार विशेष सुरक्षा पुरवणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या राज ठाकरे यांना वाय प्लस सुरक्षा आहे. तसंच योगी सरकारकडूनही त्यांना विशेष सुरक्षा मिळणार असल्याचं वृत्त हाती येत आहे.
Web Title: Raj Thackeray Ayodhya Tour Yogi Adityanath
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..