Raj Thackeray Post: जगभरात उत्साहात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आले आहे. नववर्षानिमित्त अनेक राजकीय नेते देखील शुभेच्छा देत आहेत. महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना नव वर्षानिमित्त संदेश दिला आहे. यात त्यांनी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यापासून ते सर्वच कष्टकऱ्यांच आयुष्य महागाईने होरपळून निघणं. आणि या आणि इतर प्रत्येक समस्येच्या वेळेस लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण होणे, पण नेमकं मतदानाच्या वेळेस पक्षाचा विसर पडतो अशी खंत राज ठाकरेंनी या संदेशात व्यक्त केली आहे. तर जे झाले ते स्वीकारून आपण आता काही बदलांसकट पुढे जायला हवं. असंही म्हटलं आहे.