Raj Thackeray : मनसेचा दीपोत्सव रद्द! यंदा शिवाजी पार्कवर कार्यक्रम नाही, राज ठाकरेंची मोठी घोषणा, नागरिकांनाही आवाहन, काय म्हणाले?

Raj Thackeray Cancels Shivaji Park Deepotsav 2026 : महाराष्ट्रातील दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता यंदा उत्सव साजरा करणं योग्य वाटत नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच दिवाळी साजरी करताना नागरिकांनीही काही प्रमाणात संयम बाळगावा, असं आवाहन केलं आहे.
Raj Thackeray

Raj Thackeray Cancels Shivaji Park Deepotsav 2026

esakal

Updated on: 

Diwali 2026: मुंबईतील शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा केला जातो. हा दीपोत्सव पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक मुंबईत येतात. मात्र, यंदा हा दीपोत्सव होणार नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ही घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता यंदा उत्सव साजरा करणं योग्य वाटत नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच दिवाळी साजरी करताना नागरिकांनीही काही प्रमाणात संयम बाळगावा, असं आवाहन केलं आहे.

Loading content, please wait...