'मोदी म्हणतात, हँड्स अप! निकाल पैसाऽऽऽ'

वृत्तसंस्था
बुधवार, 4 एप्रिल 2018

राज ठाकरे यांनी यापूर्वीही मोदी आणि अमित शहा यांच्यावर विविध विषयांच्या आधारे व्यंगचित्र काढून टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या फेसबुकवरील अधिकृत पेजवरून हे व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. काहीवेळातच याला लाईक आणि शेअरच्या माध्यमातून प्रतिसाद मिळत आहे.

मुंबई : व्यंगचित्रकार अशी ओळख असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना पुन्हा एकदा आपल्या व्यंगचित्रातून लक्ष्य केले आहे. यावेळी पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीवरून त्यांनी व्यंगचित्र रेखाटले आहे.

राज ठाकरे यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रात केलेल्या उल्लेखानुसार, पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी कारमधून आलेल्या जोडप्याला मोदी आणि अमित शहा हँड्स अप, निकाल पैसा असे म्हणत आहेत. मोदींच्या हातात पेट्रोल भरण्याचा पाईप आहे. तर, त्याच कारच्या मागे उभा असलेला कारमधील व्यक्ती बाबांनी, हेच ते अच्छे दिन! असे म्हणत आहे. या व्यंगचित्राला राज ठाकरे यांनी मुळ बातमी म्हणजे जगात तेलाच्या किंमती घसरल्या असतानासुद्धा भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी आजपर्यंतचा उच्चांक गाठला आहे, याचा आधार दिला आहे.

राज ठाकरे यांनी यापूर्वीही मोदी आणि अमित शहा यांच्यावर विविध विषयांच्या आधारे व्यंगचित्र काढून टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या फेसबुकवरील अधिकृत पेजवरून हे व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. काहीवेळातच याला लाईक आणि शेअरच्या माध्यमातून प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Raj Thackeray criticize Narendra Modi and Amit Shah on petrol price hike