Raj Strike; 'मोदी कसले फकीर ते तर बेफिकीर'

Raj Strike; 'मोदी कसले फकीर ते तर बेफिकीर'

मुंबई : जुन्या गोष्टी विसरण्यासाठी आता नव्या गोष्टी घडवल्या जात आहेत. भारतीय लष्कर पाकिस्तानात घुसवले पाहिजे. त्यांना एकदाचा धडा शिकवलाच पाहिजे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) सांगितले. तसेच मोदी कसले फकीर ते तर बेफिकीर, असेही ते म्हणाले.

मनसेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, सत्ताधाऱ्यांकडून राष्ट्रभक्ती आता कपाटात बंद करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्यासारख्या पुन्हा अशा काही गोष्टी घडल्या तर राष्ट्रभक्ती उघड होते. नवाज शरीफ यांना नरेंद्र मोदी केक भरवायला का गेले?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. काहीही कारण नसताना आमचे लोक मरत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नेमका करतो काय?, असा प्रश्न राज ठाकरे यांनी अजित दोवाल यांच्याबाबत उपस्थित केला. 

लोकसभेचा निर्णय नंतर

लोकसभा निवडणूक लढविणार की नाही हे आता जाहीर करणार नाही. त्याबाबतचा निर्णय नंतर जाहीर करेन, असेही राज ठाकरे म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com