Sanjay Raut Tweet | "जिनके खुदके किरदार..."; शरद पवारांना टॅग करत 'शायर' राऊतांचं ट्विट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut Tagged Sharad Pawar | Sanjay Raut Tweet
"जिनके खुदके किरदार..."; शरद पवारांना टॅग करत 'शायर' राऊतांचं ट्विट

"जिनके खुदके किरदार..."; शरद पवारांना टॅग करत 'शायर' राऊतांचं ट्विट

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या सभेमुळे राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी शरद पवारांवर आणि देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंवर टीका केल्याने आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या गदारोळातच आता संजय राऊतांनी(Sanjay Raut) शेरोशायरी करत भाष्य केलं आहे.

संजय राऊत यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना टॅग करत एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, निकले हैं वो लोग हमारी शख्शियत बिगाड़ने जिनके खुद के किरदार मरम्मत मांग रहे हैं. (Sanjay Raut Tweet)

१ मे रोजी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांनीही सभा घेतल्या. या सभांमध्ये देवेंद्र फडणवीसांचा रोख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे होता. तर राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली. त्यामुळे या दोघांनीही विषय वाटून घेतल्याची टीका राष्ट्रवादीसह शिवसेनेकडून होत होती. तसंच शरद पवारांच्या बदनामीसाठी राज ठाकरेंनी टीका केल्याचंही दोन्ही पक्ष वारंवार सांगत होते. याच अनुषंगाने संजय राऊतांच्या या ट्विटचा संदर्भ लावला जात आहे.

Web Title: Raj Thackeray Devendra Fadnavis Sanjay Raut Tweet Sharad Pawar Uddhav Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top