Raj Thackeray Grandson Name | 'शिवतीर्था'वर घुमणार आता 'ही' हाक; राज ठाकरेंच्या नातवाचं नाव ठरलं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj thackeray Grandson
'शिवतीर्था'वर घुमणार आता 'ही' हाक; राज ठाकरेंच्या नातवाचं नाव ठरलं!

'शिवतीर्था'वर घुमणार आता 'ही' हाक; राज ठाकरेंच्या नातवाचं नाव ठरलं!

राज ठाकरे यांच्या नातवाचा नामकरण सोहळा आज पार पडला. राज यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि सून मिताली यांच्या मुलाचं आज नाव ठेवण्यात आलं. त्यामुळे आता हेच नाव शिवतीर्थावर घुमणार आहे.

'शिवतीर्थ' या राज ठाकरेंच्या निवासस्थानी आज अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मिताली यांच्या मुलाचा नामकरण सोहळा पार पडला. ठाकरे घराण्याच्या पाचव्या पिढीचा वारसदार असलेल्या या बाळाचं नाव 'किआन' असं ठेवण्यात आलं आहे. गेल्या महिन्यात ५ एप्रिल रोजी मिताली ठाकरे यांनी मुलाला जन्म दिला.

बाळाच्या जन्मामुळे ठाकरे कुटुंबीय आनंदी असल्याची भावना राज ठाकरे तसंच त्यांच्या पत्नी शर्मिला यांनी व्यक्त केली होती. एका मुलाखतीत बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या मुलाच्या वेळी ज्या गोष्टी करता आल्या नाहीत, त्या नातवासोबत करायला मिळणार याचा आनंद व्यक्त केला होता. तर बाळाच्या नावाबद्दल मिश्किल भाष्यही केलं होतं. आपण बाळाचं नाव प्रदीप ठेवणार आहोत, तर अमितने बाळाचं नाव भालचंद्र ठेवायचं ठरवल्याचंही राज ठाकरे चेष्टेने म्हणाले होते.

Web Title: Raj Thackeray Grandson Name Amit Thackeray Mitali Son

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top