मनसे-भाजपा युतीच्या जोरदार चर्चा? भाजप नेत्याचे सूचक विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj-Thackeray-Devendra-Fadnavis

मनसे-भाजपा युतीच्या जोरदार चर्चा? भाजप नेत्याचे सूचक विधान

राज ठाकरे यांनी नुकतीच पक्षाची भूमिका स्पष्ट केली

डोंबिवली: भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होणार, अशी जोरदार चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये आपली भूमिका स्पष्ट असल्याचे सांगितले. त्यावर, "पक्षाच्या आपापल्या भूमिका आहेत. सहज कोणी भेट घ्यावी व चर्चा व्हावी यावरून पतंग उडविण्यात अर्थ नाही", असे सूचक विधान भाजपा नेते विनोद तावडे यांनी कल्याण येथे केले. तावडे यांच्या या विधानामुळे भाजपा मनसे युतीची चर्चा फिस्कटली का? अशी नवी चर्चा आता सुरु झाली असल्याचे दिसत आहे. (Raj Thackeray led MNS BJP alliance Gossips Vinod Tawde gives smart reply to media)

हेही वाचा: भाजप आमदाराचा अजित पवारांना सणसणीत टोला; म्हणाले "धरणात..."

निवडणुकांचे बिगुल कधीही वाजण्याची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवर पक्षांनी कार्यकर्त्यांच्या बैठका, मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव तावडे यांनी शुक्रवारी कल्याण पूर्व-पश्चिम, मोहना टिटवाळा मंडळ, अंबरनाथ आणि मलंगगड विभागातील भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी बोलताना भाजपा मनसे युतीवर त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. "प्रत्येक पक्षाची भूमिका असते. भाजपा ज्या पद्धतीने काम करत आहे, त्याच ताकदीने पुढेही काम करत राहील", असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांबद्दल झाला महत्त्वाचा निर्णय

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी माझ्या भूमिका स्पष्ट असतात असे नाशिक येथे विधान केले. यावर भाजपा नेते तावडे यांनीही जास्त बोलणे टाळले. दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकांवर ठाम असल्याने सध्या तरी युतीची चर्चा फिस्कटली आहे की काय? याची नवी चर्चा आता रंगू लागली आहे.