

Raj Thackeray addressing Maharashtra’s flood crisis, urging CM Devendra Fadnavis for farmer compensation and fair relief measures.
esakal
मराठवाड्यातील पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीवरूनही आता राजकारण आणि प्रचार सुरू झाल्याचं दिसत आहे. धाराशिवमध्ये पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे फोटो छापल्यानंतर टीकेची झोड सुरु झाली आहे. संजय राऊत यांनी यावरुन हल्लाबोल केला असतानाच आत राज ठाकरे यांनीही याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.