राज ठाकरेंकडून मोदी सरकारचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

'गेल्या काही काळातील केंद्र सरकारचा उत्तम निर्णय' अस ट्विट करत राज ठाकरे यांनी मोदी सरकारच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.मोदी सरकारवर तुटूूून पडणाऱ्या राज ठाकरे यांनी बऱ्याच वर्षांनंतर मोदी सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

मुंबई - 'गेल्या काही काळातील केंद्र सरकारचा उत्तम निर्णय' अस ट्विट करत राज ठाकरे यांनी मोदी सरकारच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.मोदी सरकारवर तुटूूून पडणाऱ्या राज ठाकरे यांनी बऱ्याच वर्षांनंतर मोदी सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

शिवसेने पाठोपाठ मनसे ने ही मोदी सरकारच्या जम्मू-काश्मीर मधील कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचा स्वागत केलं आहे.राज ठाकरे हे सातत्याने नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासह भाजप सरकारवर टीका करत होते. लोकसभा निवडणुक प्रचारात तर त्यांनी 'लाव रे तो व्हिडीओ' च्या माध्यमातून भाजप सरकारच्या धोरणांची पोलखोल केली होती.यामुळे जम्मू-काश्मीर बाबतच्या आजच्या निर्णयाबाबत राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं.

मनसेचा सोमवारी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.मात्र मनसे ने पावसाचं कारण देत अचानक हा मेळावा रद्द केला.हा मेळावा रद्द करण्यामागे देखील मोदी सरकारचा हा निर्णय कारणीभूत असल्याची चर्चा रंगली आहे.राज ठाकरे आपल्या मेळाव्यात पुन्हा एकदा मोदी सरकारवर तुटून पडणार असल्याचं सांगण्यात येत होतं.शिवाय ईव्हीएमच्या मुद्यातूनही राज ठाकरे भाजप  वर निशाणा साधणार होते.मात्र मोदी सरकारने कलम 370 रद्द करण्यासारख्या मुद्याला हात घातल्याने राज ठाकरे यांची भाजप विरोधी भूमिका त्यांच्यावरच बुमरँग होण्याची शक्यता असल्याने त्यांनी आजचा आपला कार्यकर्ता मेळावाच रद्द केल्याचं बोललं जातंय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray Modi Government Article 370 Appreciation