राज ठाकरेंचा इशारा; म्हणाले, वेळ आली तर मोदींवरही बोलेल

Raj Thackeray
Raj ThackerayRaj Thackeray
Updated on

ठाणे : मुंबईत पार पडलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर हल्ला केला होता. मात्र, भाजपवर कोणतीही टीका केली नव्हती. उलट उत्तर प्रदेशच्या विकासाची स्तुती केली केली. यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी त्यांच्या भाषणाला भाजपची स्क्रिप्ट अशी टीका केली होती. यावर उत्तर देताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वेळ आली तर मोदींवरही बोलेल असे उत्तर दिले.

ठाण्यात मनसेच्या उत्तर सभेत ते बोलत होते. दोन ते तीन वर्षांपूर्वी केलेल्या भाषणात भाजपवर (BJP) टीका केली होती. मात्र, यंदाच्या गुढीपाडवा मेळाव्यात भाजपवर टीका का केली नाही, असा प्रश्न राज्य सरकारमधील नेत्यांनी विचारला होता. हो टीका केली नाही. कारण, मला महाविकास आघाडी सरकारचे वाभाडे बाहेर काढायचे होते. नेहमी भाजपवर बोलायचे का? असाही प्रश्न राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केला.

Raj Thackeray
नरेंद्र मोदी म्हणाले, भारत जगाला पोसण्यासाठी तयार; पण...

गुढीपाडवा मेळाव्यानंतर अनेकांनी तारे तोडले होते. त्यांना उत्तर देण्यासाठी आजची सभा आहे. महाविकास आघाडीच्या प्रयोगावर टीका ही भाजपची स्क्रिप्ट कशी, असा प्रश्नही राज ठाकरे यांनी केला. ईडीच्या कारवाईच्या भीतीमुळे ट्रॅक बदलला असा अनेकांचा गैरसमज झाला आहे. मला ट्रॅक बदलण्याची गरज नाही. कुठल्याही नोटिसांना मी भीक घालत नाही, असेही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

नरेंद्र मोदी (Narendra modi) पंतप्रधान व्हावे हे म्हणणारा मी पहिला माणूस आहे. जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द केलं तेव्हा मीच पहिल्यांदा ट्विट करून अभिनंदन केले होते. त्यांनी चांगले काम केले म्हणून अभिनंदन केले. काही चुकीचे केले तर नक्की मोदींवरही (Narendra modi) बोलेल, असेही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

barshi crime
advocate
Solapur city police
MBBS Admission Fraud
Marathi News Esakal
www.esakal.com