राज यांच्या चौकशीमागे भाजपची वेगळीच 'खेळी'; आघाडीनेही खेळला होता 'हा' डाव

टीम ई-सकाळ
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडी चौकशी करणार आहे. यानंतर मात्र, राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून राज यांच्या चौकशीमागे भाजपचीच खेळी असल्याचे बोलले जात आहे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडी चौकशी करणार आहे. यानंतर मात्र, राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून राज यांच्या चौकशीमागे भाजपचीच खेळी असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शह देण्यासाठीच भाजपने ही खेळी केली असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी 2009 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने अशाच प्रकारची खेळी केली होती, असेही बोलले जात आहे.

भाजप आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग चालू असताना दोन्ही पक्षातले मूळ कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. दुसरीकडे सरकारच्या विरोधात असणारी नाराजी मतांमध्ये परावर्तीत होऊन ती काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बाजूने गेली तर याचा युतीला फटका बसू शकतो. मग असे होऊ नये आणि दुसऱ्या कोणाला फायदा झाला तरी चालेल या हेतून राज ठाकरे यांना हवा दिली तर संभाव्य  धोका टाळता येईल असे युतीतील जाणकारांचे म्हणणे आहे, आता राज यांनी ईडीची नोटीस पाठवल्याने राज यांना सहानुभूती मिळेल आणि ही नाराजी राजच्या बाजूने जाईल अशी भाजपची खेळी असल्याचे दिसत आहे.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीनेदेखिल अशा प्रकारची खेळी केली होती. त्यावेळी राज यांच्या मनसेला हवा मिळावी म्हणून राज यांना अटक करण्यात आली आणि सरकार विरोधी मते फुटुन विधानसभेला सहानुभूतीच्या जीवावर राज यांच्या मनसेला मिळाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray receives ED notice NCP and Congrress Governments history repeats