Raj Thackeray : "Blue Film काढली असत तर बर झालं असत", राज ठाकरे असं का म्हणाले? | Raj Thackeray told story of press conference about Blue Print of Development | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

Raj Thackeray : "Blue Film काढली असत तर बर झालं असत", राज ठाकरे असं का म्हणाले?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १७ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे मनसेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी एका पत्रकार परिषदेतील किस्सा सांगितला. 

मनसेने राज्याच्या विकासावर ब्लू प्रिंट काढली होती. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, एका परिषदेत मला विचारले, तुमची Blue Film आलेली. मी म्हटलं सालं ती काढली असती तर बरं झालं असतं. बघितली तरी असती. ब्लू प्रिंट काढली कोणी बघितली नाही. 

ब्लू प्रिंट यायच्या आधी मला सर्व बोलायचे ब्लू प्रिंट कुठे आहे. मात्र ज्यावेळी जाहीर केली तेव्हापासून आजपर्यंत मला त्यावर कोणीही विचारल नाही. कोणी वाचली नाही, असे राज ठाकरे म्हणाले. 

संदीप देशपांडे हल्ला प्रकरणावर राज ठाकरे म्हणाले, हल्ला करणाऱ्याला प्रथम कळेल की त्याने हल्ला केला आणि नंतर सर्वांना कळेल हल्ला कुणी केला. माझ्या मुलांचे रक्त मी असे वाहू देणार नाही. 

लोक विचारतात काहीजण पक्ष सोडून गेले. लोक म्हणतात राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते. मग निवडणुकीत मत का पडत नाहीत. मग ते १३ आमदार आले होते ते काय सोरेटवर आले होते का?, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Raj Thackeraymns