
Latest Marathi News: २००५ साली विभक्त झालेले ठाकरे बंधू २०२५ मध्ये वरळी डोममध्ये विजयी मेळाव्यामध्ये एकत्र आले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा झाली. बातम्या झाल्या, राजकीय विश्लेषणंसुद्धा आली. पण आता पुन्हा हाच मुद्दा २ दिवसांनी चर्चेत आला कारण, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसैनिक आणि मनसे प्रवक्त्यांना दिलेल्या एका आदेशांमुळे.