
उत्तर सभेत राज ठाकरेंच्याआधी वसंत मोरे करणार भाषण
ठाणे : गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेचा मेळावा पार पडला होता. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याला चांगलाच विरोध दर्शविला होता. यावरून चांगलेच राजकारण तापले होते. त्यांच्या वक्तव्यावर पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली होती. यामुळे त्यांना शहराध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. यानंतर वसंत मोरे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. आता ते मंगळवारच्या सभेत राज ठाकरे यांच्या आधी भाषण करणार असल्याची माहिती आहे.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याला विरोध असल्याचे सांगितले होते. यामुळे राज ठाकरे हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद घालत असल्याचे बोलले गेले. प्रसिद्धीसाठी असे वक्तव्य करण्यात येत असल्याचे अनेकांकडून बोलले गेले. आपल्या संपलेल्या पक्षाला वाचवण्यासाठी हिंदू-मुस्लिमांचा विषय राज ठाकरेंनी काढल्याचा आरोप झाला.
हेही वाचा: नरेंद्र मोदी म्हणाले, भारत जगाला पोसण्यासाठी तयार; पण...
त्याच्या या वक्तव्याला पक्षातूनच वसंत मोरे (Vasant More) यांच्या रूपाने विरोध झाला. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केल्याने वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. यानंतर मोरे यांना मोठ्या पक्षांकडून ऑफर येण्यास सुरुवात झाली. मात्र, त्यांनी राज ठाकरेंना भेटल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचे सांगितले.
यानंतर राज ठाकरेंनी (Raj Thackeray) वसंत मोरे यांना भेटीसाठी मुंबईला बोलावले होते. काल शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली असता राज ठाकरे यांनी दीड तास वसंत मोरे यांच्याशी चर्चा केली. ‘तुझी भूमिका मला सांगायची होती. मीडियात कशाला गेला होता? तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे उद्याच्या उत्तर सभेत मिळतील’, असे राज ठाकरे यांनी मोरेंना (Vasant More) सांगितले होते.
हेही वाचा: मोदींनी केली भूमिका स्पष्ट; म्हणाले, पुतिन व झेलेन्स्की यांनी चर्चा करावी
मंगळवारी सायंकाळी मनसेची ठाण्यात उत्तर सभा पार पडणार आहे. सभेत राज ठाकरे आतापर्यंत झालेल्या टीकेला उत्तर देतील. तत्पूर्वी, वसंत मोरे यांना सभेत माझ्यापूर्वी भाषण करू दे, अशी सूचना राज ठाकरे यांनी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना दिली आहे. राज ठाकरे यांच्या भाषणापूर्वी वसंत मोरे बोलणार आहेत. राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) आदेशाप्रमाणे भाषण करणार असल्याचे वसंत मोरे (Vasant More) यांनी सांगितले.
Web Title: Raj Thackeray Vasant More Thane Uttar Sabha
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..