
मोदींनी केली भूमिका स्पष्ट; म्हणाले, पुतिन व झेलेन्स्की यांनी चर्चा करावी
युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या विषयावर आमच्या संसदेत सविस्तर चर्चा झाली आहे. अलीकडेच युक्रेनच्या बुका शहरात नागरिकांच्या मृत्यूची बातमी चिंताजनक आहे. निष्पक्ष तपासाची मागणी करण्यात आली आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. चर्चेतून समस्या सुटतील अशी आशा आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) सोमवारी आभासी बैठकीत एकमेकांना भेटले. यादरम्यान युक्रेन संकट, दक्षिण आशियाचा विकास, इंडो-पॅसिफिकमधील परिस्थिती आणि द्विपक्षीय सहकार्य हे चर्चेचे महत्त्वाचे मुद्दे होते. वॉशिंग्टनमध्ये अमेरिका आणि भारत यांच्यातील चौथ्या २+२ चर्चेपूर्वी ही आभासी बैठक झाली.
हेही वाचा: शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान; बिनविरोध निवड
आम्ही आमच्या बाजूने औषधे आणि इतर साहित्य युक्रेनला पाठवले आहे. युक्रेनचे संकट लवकरच संपेल अशी आशा आहे. यावर्षी भारत आपल्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. जागतिक राजकारणाच्या दृष्टिकोनातून अमेरिकेसोबतचे आमचे संबंध अतिशय महत्त्वाचे आहेत. ७५ वर्षांपासून आमची मैत्री भारत-अमेरिका संबंधांचा अविभाज्य भाग आहे. जगातील दोन सर्वांत जुनी आणि सर्वांत मोठी लोकशाही म्हणून आम्ही नैसर्गिक भागीदार आहोत: तुमचे पुन्हा एकदा खूप खूप आभार, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
दीड महिन्यात अनेक देशांचे उच्चस्तरीय नेते भारतात आले आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, मुली आणि देशावर आर्थिक निर्बंध असताना रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह भारतात आले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेण्यासोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचीही भेट घेतली.
त्याचवेळी अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दिलीप सिंग यांनीही नवी दिल्लीला भेट देऊन रशियाकडून तेल खरेदीबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली. मात्र, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे स्पष्ट केले आहे की तेलाच्या किमतींमध्ये जागतिक वाढ आणि जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्यय यांच्या दरम्यान भारत आपल्या राष्ट्रीय हितांना प्राधान्य देईल.
हेही वाचा: Ladakh : पँगाँग तलावात चालवली कार; सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया
एका विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला
आजचे संभाषण अशावेळी होत आहे जेव्हा युक्रेनमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. काही आठवड्यांपूर्वी २०,००० हून अधिक भारतीय युक्रेनमध्ये अडकले होते. खूप मेहनतीनंतर आम्ही त्यांना तिथून सुखरूप बाहेर काढू शकलो. मात्र, एका विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला, असेही संवाद साधताना नरेंद्र मोदी म्हणाले.
Web Title: Narendra Modi Joe Biden Meeting Detailed Discussion Ukraine Russia
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..