
राज्यात हिंदी सक्तीवरुन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधूनी एकच भूमिका घेत एकत्र मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्त मनसे आणि शिवसेना यांची युती होणार असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान मनसे आणि शिवसेनेकडून एकत्र मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आता भाजपकडून सुद्धा आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहे.भाजपकडून मराठीला अभिजात दर्जा आम्ही दिल्याचे वारंवार सांगितलं जात आहे. पण आता मनसेचे संदीप देशपांडे यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे.