
पुण्याच्या सभेत ओवैसी, औरंगजेबाची कबर हा विषय राज यांच्या रडारवर राहणार !
पुणे : पुण्यातील सभेत अकबरुद्दीन ओवैसी आणि औरंगजेबाची कबर हा विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रमुख राज ठाकरे यांच्या रडारवर असणार आहे. या बाबतचे स्पष्ट संकेत पुणे शहर मनसेने जाहीर केलेल्या पोस्टरवरुन मिळत आहेत.
बुडाला औरंग्या पापी, म्लेंछसंव्हार जाहाला|
मोडलीं मांडली छेत्रें, आनंदवनभुवनी||
या ओळी प्रामुख्याने या पोस्टरवर छापण्यात आल्या आहेत. (Raj Thackeray Will Speak On Akabarudding Owaisi, Aurangzeb Tomb In Pune Rally)
अयोध्या दौरापूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुण्यात जाहीर सभा होणार आहे. या सभेवरुन सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. सदरील सभा येत्या रविवारी (ता.२२) होत आहे. यात ठाकरे कोणा-कोणाचा समाचार घेणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. नेमके सभेत कशावर बोलले जाईल याची चुणूक पुणे (Pune) मनसेने पोस्टर प्रसिद्ध करुन दिली आहे.
एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरेंना तुम्हाला कोण विचारत या शब्दांमध्ये टीका केली होती. कुत्र्यांना भोकू द्यावे. सिंह शांततेत चालतो, असे ते म्हणाले होते.