राज ठाकरे यांचा दौरा उशिराने शिवसेनेला सॉफ्ट कॉर्नर 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

मुंबई - महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात सर्व पक्षांनी आघाडी घेतली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा प्रचार दौरा उशिराने सुरू होत आहे. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून "बॅकफूट' गेलेल्या राज यांच्या सभांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे भाजपवर टीकास्त्र सोडणार असून शिवसेनेला सौम्य भाषेत चिमटे काढतील, अशी माहिती मनसेच्या गोटातून देण्यात आली. 

कोणत्याही निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेणाऱ्या राज ठाकरे यांच्या दौऱ्याचा तपशील गुलदस्त्यात आहे. राज यांचा दौरा आखण्याची कार्यवाही दोन दिवसांपासून सुरू असल्याची माहिती राजगड कार्यालयातून देण्यात आली. सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये तुंबळ युद्ध सुरू असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत आहे. गेल्या अनेक निवडणुकांचे निकाल लक्षात घेता शिवसेनेच्या मतांमध्ये राज ठाकरे फूट पाडत असल्याचा आरोप होत आहे. यंदाच्या निवडणुकीत मात्र हे आरोप टाळण्यासाठी राज ठाकरे शिवसेनेवर सौम्य भाषेत टीका करतील तर भाजपवर आपल्या खास शैलीत तुटून पडणार असल्याची चर्चा आहे. 

राज ठाकरे यांच्या मुंबईसह ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक शहरात सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्थानिक निवडणुकीत सर्व पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली असून कोणत्या पक्षांने काय मुद्ये उचलले आहेत त्यावर राज यांच्या प्रचाराची दिशा ठरणार असल्याचे मनसेच्या एका सरचिटणीस पदावर कार्यरत असलेल्या नेत्याने सांगितले. 

राज यांच्या प्रचारातील संभाव्य मुद्दे 
 शिवसेनला गुजराती मतांसाठी हार्दिक पटेल कसा चालतो 
 युतीमुळे 25 वर्षे सडली असतील तर शिवसेना प्रमुखांनी केलेली युती गैर होती काय? 
 नोटाबंदीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार 
 गुंड प्रवृत्तीच्या व्यक्‍तींच्या प्रवेशावरून भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न 

Web Title: Raj Thackeray's late tour