...अखेर राज ठाकरे यांचे 'ते' भाकीत खरे ठरले

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

राज ठाकरे यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर केलेल्या टीका खरी ठरली असल्याचा दावा मनसेने केला आहे. त्याला अनसरून एक व्हिडिओ मनसेने पाेस्ट केला आहे. 

मुंबई : सध्या देशाची आर्थिक स्थिती अंत्यत बिकट असल्याचे चित्र आहे. रोजगार निर्मिती पाहि्जे तेवढी होताना दिसून येत नाही. मंदीमुळे अनेक जणांना रोजगारापासून मुकावे लागत आहे. अनेक कंपन्या डबघाईला आल्याचे चित्र पाहयला मिळत आहे. अशी स्थिती होईल असे भाकीत राज साहेबांनी केल्याचा दावा मनसेने केला आहे.

आर्थिक स्थिती सावरण्यासाठी सरकारने आरबीआयकडून 1 लाख 76 हजार कोटी घेतल्याची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आपल्या लाभांश आणि अतिरिक्त राखीव निधीतून सरकारला १.७६ लाख कोटी रुपये देण्यास तयार झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या ८४ वर्षांच्या इतिहासात ही सर्वात मोठी रक्कम आहे. यावरून विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 9 ऑगस्टला केलेल्या भाषणाची आठवण करून देत मनसेने सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली आहे. मनसेने व्टीट करत नोटाबंदी व जीएसटीमुळे पार विस्कटलेल्या अर्थव्यवस्थेला आरबीआयच्या रिझर्व्ह बँकेच्या रिझर्व्हचं ठिगळ लागणार असल्याचा व्हिडीआे पोस्ट केला होता. त्यात राज ठाकरे यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर केलेल्या टीकेचे भाषण टाकले आहे.

दरम्यान, पैसेरहीत अर्थक्रांतीला सुरवात झाल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले होते. या भाषणात राज ठाकरे यांनी म्हटले होते की, आरबीआयकडून पैसे घेऊन देश चालविण्याची वेळ आली आहे. आरबीआय म्हणजे रिझर्व्ह क होय. पैसे रिझर्व्ह ठेवणारी बँक होय. परंतू याच बँकेकडून सरकारने पैसे घेतल्यास देशातील बॅंक व्यवस्था धोक्यात आल्यास त्यााला बळ देण्यासाठी ही बॅंक असते तीच बॅंक धोक्यात आली तर करायचे काय़. अशा प्रकार टीका त्यांनी केली होती. आज देशाची स्थिती बिकट आहे ती अजून बिकट होईल, असे भाकीत ठाकरे यांनी केले होते.  ते आज खरे ठरत असल्याचा दावा मनसेने केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raj thackerays speech august 9 proved true mns claim