राज ठाकरे यांच्याकडून अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

रविवारी पुण्यात पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अजित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी पानी फाऊंडेशनच्या कामामुळे जर जलसंधारणचं काम होऊ शकतं तर इतक्या वर्षाचा जलसंधारणाचा पैसा गेला कुठे ? असा थेट प्रश्न राज ठाकरे यांनी केला होता. मात्र, अजित पवारांनी काहीजण बोलघेवड्या सारखं बोलतात, असे म्हणत राज ठाकरेंना त्याचे प्रत्युतर दिले होते. त्यावर राज यांनी आज अजित पवारांनी का मनावर घेतले आहे हे समजले नसल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला आहे.

ठाणे : रविवारी पुण्यात पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अजित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी पानी फाऊंडेशनच्या कामामुळे जर जलसंधारणचं काम होऊ शकतं तर इतक्या वर्षाचा जलसंधारणाचा पैसा गेला कुठे ? असा थेट प्रश्न राज ठाकरे यांनी केला होता. मात्र, अजित पवारांनी काहीजण बोलघेवड्या सारखं बोलतात, असे म्हणत राज ठाकरेंना त्याचे प्रत्युतर दिले होते. त्यावर राज यांनी आज अजित पवारांनी का मनावर घेतले आहे हे समजले नसल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला आहे.

आज (ता.14) राज ठाकरे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे म्हणाले, मी जे बोललो ते 1960 पासून सुरू आहे, त्यावर फक्त भाष्य केले होते. अजित पवारांनी मनाला का लावून घेतलं, हे मला माहिती नाही. पण, मनाला लावून घेऊ नका असं सांगत त्यांनी अजित पवारांची मनधरणी करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. तसेच, या पत्रकार परिषदेदरम्यान, ठाण्याला आता अत्यंत प्रामाणिक पोलीस आयुक्त मिळाल्याने ठाण्याचे आता चांगले होणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

तसेच, लोकसहभागातून 1 लाख 20 हजार विहिरी अमिर खान यांनी बांधल्या तर मग सरकारचे अधिकारी काय करतात, सरकार आपली जबाबदारी का झटकतंय, पाणी हा विषय राज्यातला सर्वात महत्वाचा विषय आहे अशा विविध मुद्यावर त्यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केले. तसेच, भाजपाला आता कळलंय की ते हरले आहेत.
 भाजपा आता निवडून येणार नाही म्हणून त्यांचा एकत्रित निवडणुका घेण्याचा डाव असल्याची टीकाही त्यानी यावेळी केली.

Web Title: raj thackrey Concussions Ajit Pawar