पालघरमध्ये राजेंद्र गावित भाजपचे उमेदवार 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 9 मे 2018

मुंबई - पालघर लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजपने राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. पालघरमधील कॉंग्रेसचे नेते अशी ओळख असलेल्या; तसेच यापूर्वी राज्यमंत्रिपद भूषवलेल्या गावित यांनी मंगळवारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना तिकीट दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. ते गुरुवारी (ता. 10) उमेदवारी अर्ज भरतील. 

भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. वनगा यांच्या कुटुंबीयांनी अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवारी कोणाला द्यावी, हा पेच होता. या पार्श्‍वभूमीवर गावित यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. 

पालघरची जागा भाजपची आहे. ती भाजपनेच यापूर्वी जिंकली आहे. ती आमच्याकडेच ठेवण्यासाठी गावित यांना पक्षात प्रवेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायला हवा होता, असे मत व्यक्त करतानाच मतदार भाजपसोबत असल्याने आम्हाला यश मिळेल, असा विश्‍वास दानवे यांनी व्यक्त केला. 

शिवसेनेने असे वागायला नको होते! 
या पोटनिवडणुकीत ऍड. चिंतामण वनगा यांच्या कुटुंबातील व्यक्तीलाच उमेदवारी देण्याचा आमचा विचार होता. तशी तयारीही करण्यात आली होती; पण वनगा कुटुंबीयांनी शिवसेनेत प्रवेश केला, ही बाब दुर्दैवी आहे. श्रीनिवास वनगा यांना तिकीट देऊन त्यांना अज्ञातस्थळी ठेवण्याची शिवसेनेची कृती योग्य नाही. शिवसेनेने असे वागायला नको होते, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. 

Web Title: Rajendra Gavit BJP candidate in Palghar