राज्यमंत्री यड्रावकरांसह 500 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

कोरोना नियमांचा भंग; राज्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल
Rajendra Patil Yadravkar
Rajendra Patil Yadravkaresakal
Updated on: 

जयसिंगपूर (कोल्हापूर) : जिल्हा बँकेच्या (KDCC Bank Elections)विजयाबद्दल कोरोना (Coronavirus)नियमांचा भंग करून मिरवणूक काढल्याप्रकरणी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar) यांच्यासह चारशे ते पाचशे कार्यकर्त्यांवर जयसिंगपूर (Jaysingpur)पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील (Vijay Patil)यांनी पोलिसात फिर्याद दिली. शनिवारी (ता.९) जयसिंगपूर येथील क्रांती चौक ते गल्ली नंबर सहा दरम्यान विजयी मिरवणूक काढली. यात जेसीबीच्या (JCB) साह्याने गुलालाची उधळण करण्यात आली.

कोरोनाचे नियम डावलून मिरवणूक काढल्याप्रकरणी राज्यमंत्री यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar)त्यांचे बंधू उपनगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, राहुल बंडगर, रोहित पाथरवट, विनायक गायकवाड, तेजस उपाध्ये, अभिनंदन देमापुरे, अक्षय परळीकर, शुभम ऐतवडे (रा. जयसिंगपूर), धीरज पाराज (रा. दानोळी) यांच्यासह सुमारे चारशे ते पाचशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक श्री वाघ तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rajendra Yadravkar Sainik Takali MIDC black flag shirol
Sainik Takli MIDC controversy shirol
Sainik Takli MIDC protest shirol
Sainik Takli Protest mla rajendra patil yadravkar shirol
Marathi News Esakal
www.esakal.com