
राजेंद्र पाटील यड्रावकरांकडून केजरीवालांचे कौतुक; म्हणाले...
कोल्हापूर: शिक्षण विषयात अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सरकारने दिल्लीत चांगले काम केले आहे. आता तसेच काम महाराष्ट्रात होण्याची गरज आहे. तसेच ज्या पध्दतीने केजरीवाल यांनी दिल्लीत जो कारभार केला त्याच्या बळावर पंजाब राज्य जिंकले तसाच कारभार महाराष्ट्रात व्हायला हवा अशी अपेक्षा राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar) यांनी व्यक्त केली. आज ते कोल्हापुरात बोलत होते.
हेही वाचा: Kalburgi Murder Case: कलबुर्गी हत्या प्रकरणात आरोपींना ओळखण्यात यश
यावेळी राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) कौतुक करताना ते म्हणाले, सर्वसामान्यांच्या आरोग्याला महाविकास आघाडी सरकारने प्राधान्य झाले. आरोग्य विभागाने कोरोनाच्या काळात उत्तम काम केले. मोफत रेमडेसिविर वाटणारी कोल्हापूर जिल्हा परिषद ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद असल्याचेही त्यांनी सांगितले.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत जो कारभार केला त्याच्या बळावर त्यांनी पंजाब हे दुसरे राज्य जिंकले. असा कारभार महाराष्ट्रात व्हायला हवा अशी अपेक्षा शिवसेनेचे नेते आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या विविध पुरस्कारांचे वितरण मंत्री यड्रावकर यांच्या हस्ते आज (ता.१९) दुपारी शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ सभागृहात करण्यात आले. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची अनुपस्थिती चर्चेची ठरली.
Web Title: Rajendra Patil Yadravkar Appreciation On Arvind Kejriwal Political
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..