कोरोना परिस्थितीबद्दल केंद्राचं पत्र; राजेश टोपे म्हणतात...

राज्यातील 135 पैकी 85 रुग्ण मुंबईत आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.
Rajesh Tope
Rajesh Topeसकाळ डिजिटल टीम
Updated on

राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली होती. मात्र रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याची चिन्हं दिसत असतानाच केंद्र सरकारने काही राज्यांना पत्र पाठवलेलं आहे. त्यासंदर्भात तसंच राज्यातल्या कोरोना परिस्थितीबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केलं आहे.

Rajesh Tope
कोरोना वाढतोय, केंद्राचा पत्रातून राज्यांना इशारा

केंद्राने पाठवलेल्या पत्रामध्ये इतर राज्यांचाही समावेश असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. तसंच राज्यातील 135 पैकी 85 रुग्ण मुंबईत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. लसीकरणाच्या बाबतीत बोलताना राजेश टोपे म्हणाले की, मुलांमधलं लसीकरणाचं प्रमाण वाढलं आहे. बुस्टर डोसबद्दल केंद्राने अद्याप निर्देश दिलेले नाहीत. मात्र कोणाला बूस्टर डोस घ्यायचा असेल तर खासगी रुग्णालयातून घेऊ शकता.

Rajesh Tope
दिल्लीत 632 नवे कोरोना रुग्ण; तर मुंबईत 45 दिवसांत सर्वाधिक रुग्ण

परिस्थिती नियंत्रणात असली तरी नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहनही राजेश टोपे यांनी केलं असून मास्क बंधनकारक नसल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com