Sinkhole Near Shivaji maharaj Statue Malvan : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या वर्षी कोसळला होता. हा पुतळा आता पुन्हा उभारण्यात आला आहे. मात्र, आता या पुतळ्याच्या बाजुची जमीन खचली आहे. याठिकाणी भगदाड पडलं आहे. यामुळे शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका निर्माण होईल का? अशी भिती निर्माण झाली आहे.